कणकवली तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीवर दीपक दळवी यांची नियुक्ती…

कणकवली : तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीवर दिव्यांग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी पदावर दीपक अनंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची निवड उपयुक्त ठरणार असल्याचे मत स्थानिक स्तरावर व्यक्त केले जात आहे.

श्री. दळवी हे समाजकार्यात सक्रिय असून, त्यांनी दिव्यांग हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न प्रशासनापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page