भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ साठी जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारी जाहीर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक प्रभारी म्हणून प्रमोद जठार तर निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यावर जबाबदारी..

कणकवली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ साठी जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही घोषणा बुधवारी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आली.

भाजपा पक्षाने राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारी नियुक्त केले असून, प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पक्षाची निवडणूक रणनीती प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी आम. प्रमोद जठार असून निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत करत सुसूत्र संघटनात्मक नियोजन सुरू केले आहे. या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे.

You cannot copy content of this page