⚡मालवण ता.०२-: श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान कृष्णनगर आचरा पिरवाडी या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी नऊ वाजता गावडे काका महाराज यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक, गावडे काका महाराज यांचे पाद्यपूजन, सकाळी दहा वाजता शिलाण्यास सोहळा ,अकरा वाजता सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान कृष्ण नगर आचरा पिरावाडी अध्यक्ष विश्वस्त , सभासद आणि ग्रामस्थ यांनी केले आहे .
श्री राधाकृष्ण मंदिर शिलान्यास सोहळा ३नोव्हेंबर रोजी…
