⚡मालवण ता.०२-:
दारूबंदीचा पुरस्कर्ता म्हणून प्रसिद्धी पावलेल्या आणि मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील हरिनाम सप्ताहाची आज गाडगे फोडून सांगता झाली. गेले आठ दिवस हरीनाम जप आणि भजनांच्या सादरीकरणाने रंगलेल्या या सोहळ्यास भाविकांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवीत लाभ घेतला.
डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त मानकरी वं श्री देव रवालनातज मंदिर विश्वस्त मंडळातर्फे विविध कार्यक्रम संपन्न झाले. गेले आठ दिवस अखंड हरीनाम जप करण्यात आला. तसेच डांगमोडे गावातील भजनी मंडळे वगळता बाहेरील विविध गावातील तब्बल २८ भजनी मंडळानी आठ दिवस आपली भजन सेवा सादर केली. यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण पसरले होते. आज सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी विठ्ठल रखुमाई मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. गाडगे फोडून हरीनाम सप्ताहची सांगता करण्यात आली. या सप्ताहास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
