⚡सावंतवाडी ता.११-: पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ सावंतवाडी शहर भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी पंडितजींच्या कार्याची महती विषद करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी भाजपा युवामोर्चा राज्य उपाध्यक्ष लखमराजे भोसले, सावंतवाडी मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर, सहसंयोजक केतन आजगांवकर, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, नगरसेविका तथा महिला मंडल अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, सौ. सुकन्या टोपले, सौ. दुलारी रांगणेकर, सौ. सुनीता पेडणेकर, सौ. निलम नाईक आदी उपस्थित होते.
