⚡मालवण ता.०१-:
मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्राध्यापक कैलास राबते यांची सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
प्रा कैलास राबते हे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटीवर त्यांनी काम केलेले आहे यापूर्वी त्यांना वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांचा राज्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे मालवण मधील सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो प्राध्यापकांच्या बुक्टु संघटनेचे ते क्रियाशील कार्यकर्ते आहेत फुले शाहू आंबेडकर विचार मंच मालवणचे ते सल्लागार व मार्गदर्शक म्हणून काम करतात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक महादेव मोरे यांच्यावर त्यांनी साहित्य लेखन केलेले आहे अनेक विषयावर त्यांनी समाज प्रबोधनात्मक व्याख्याने
दिली आहेत ग्रामीण साहित्यिक महादेव मोरे यांच्या साहित्य व जीवन कार्यावर त्यांचे काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत या त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री साईनाथ चव्हाण,संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ऍड समीर गवाणकर, महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यानी त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
