वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण…

⚡वेंगुर्ले ता.०१-: भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व महिला मोर्चा च्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबीर भाजपा युवा नेते विशाल परब यांनी पुरस्कृत केले असून सोमवार ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी ३ ते ६ वेळात साईमंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये उमा इन्स्टिट्यूट, चिपळूण च्या संचालिका उमा म्हाडदळकर या मोत्यांचे दागिने, फॅब्रिक दागिने (कपड्यांपासून) , काथ्याच्या दोरी पासून शोभेच्या वस्तू, मॅट रांगोळी, व या प्रशिक्षणाचे खास आकर्षण, फॅशनच्या दुनियेत सध्या ट्रेंड असलेला ‘सब्यासाची ब्लाउज’ शिकवण्यात येणार आहे. यावेळी महिलांना इतर शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे . तरी वेंगुर्लेतील जास्तीत जास्त महीलांनी सहभागी होऊन या मोफत प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा , असे आवाहन भाजपा महीला मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुषमा प्रभू खानोलकर, सुजाता पडवळ, श्रेया मयेकर, शितल प्रभुखानोलकर, प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर, वृंदा गवंडळकर, कृपा गिरप मोंडकर आदीसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page