सातोसे येथे देवी माऊली पंचायतन देवस्थानचा अखंड हरीनाम सप्ताह रविवारीपासून…

⚡सावंतवाडी ता.३१-: सातोसे येथील देवी माऊली पंचायतन देवस्थानच्या अखंड हरीनाम सप्ताहाला रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त गावातील भजन मंडळांचे अखंडित भजन होणार आहे. रविवारी रात्री 12 वाजता दिंडी होणार आहे.

दुसऱ्या दिवशी सोमवार दि.3 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर पावणी, कौल व प्रसाद होणार आहे.संध्याकाळी 6 वाजता तरंगकाठी देवतांचा कवळास सोहळा होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवी माऊली स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती, मानकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page