आमदार दीपक केसरकर यांची माहिती: आयत्यावेळी गडबड होऊ नये म्हणून भाजपच्या नेत्यांशी करणार चर्चा..
⚡सावंतवाडी, ता.३१-:
आगामी स्थानिक निवडणुकीत युती करायची की स्वबळावर लढायचं, या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उद्या बैठक होणार असून त्यामध्ये युतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
ते पुढे म्हणाले की, “स्थानिक निवडणुका जवळ आल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत. शेवटच्या क्षणी गडबड होऊ नये म्हणून आम्ही आगाऊ चर्चेला सुरुवात केली आहे. जर युती झाली नाही, तर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन स्वबळावर तयारी सुरू करता येईल,” असेही ते म्हणाले.
आमदार केसरकर पुढे म्हणाले की, “युती झाली तर ज्या जागा भाजपच्या आहेत त्या आम्ही भाजपलाच सोडू. मात्र युती झाली नाही तर आमची स्वतंत्र तयारी सुरू होईल,” असे स्पष्ट केले.
