बांद्यात रविवारी दि.2 रोजी श्री विठोबाची जत्रा…

⚡बांदा ता.३०-: बांदा येथिल प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशीला रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता काकडआरतीने हा सोहऴा आरंभ होईल. त्यानंतर दर्शनास सुरुवात होईल. सायंकाळी उत्सवमुर्तीचे मंदिरात आगमन होईल. सायं 5 ते 7 श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन मंडळाची भजनसेवा होईल. 7 वाजता नित्य सायंआरती होईल. रात्रो ठिक 9 वाजता श्रींचा पालखी सोहळा आरंभ होईल. या जत्रोत्सवानिमित्त रात्रो आजगांवकर दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर,बांदा देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page