⚡सावंतवाडी ता.२७-: सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी एस. पी. के. कॉलेज, सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे.
गट १: इयत्ता पाचवी ते सातवी (वेळ – ३ ते ४ मिनिटे) यासाठी विषय – ‘बालपण हरवत चाललंय…’, ‘पुस्तक माझा मित्र’, ‘मी मुख्यमंत्री झाले/झालो तर…’
गट २: इयत्ता आठवी ते दहावी (वेळ – ४ ते ६ मिनिटे) यासाठी विषय – ‘माझ्या स्वप्नातील उद्याचं कोकण’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता – शाप की वरदान’, ‘समाज माध्यमांचा अतिरेक होतोय का?’ असे असतील.
स्पर्धा मराठी भाषेत घेतली जाणार असून, प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धकांनी शालेय गणवेशात उपस्थित राहणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. तसेच स्पर्धेच्या दिवशी आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.
नावनोंदणीची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२५ असून, सहभागी विद्यार्थ्यांसाठी व एका शिक्षक/पालकासाठी अल्पोपहाराची सोय आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
बक्षीसांचे स्वरूप:
इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसाठी अनुक्रमे ₹२०००, ₹१५०० व ₹१००० इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
तर इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसाठी अनुक्रमे ₹२५००, ₹२००० व ₹१५०० इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक – **९४०४७७९९४
