सावंतवाडी तालुका भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी अब्दुल सुलेमान साठी यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२८-: भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष निसार शेख यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी अब्दुल सुलेमान साठी यांची संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणिस शहानवाज शहा, भाजपचे आदिल शेख, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष श्री. सुधीर आडिवरेकर, सावंतवाडी शहर सरचिटणीस श्री. दिलीप भालेकर, जेष्ठ भाजप कार्यकर्ते श्री. शाम केनेवडेकर, महिला सावंतवाडी शहर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षा सलमाबेगम शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नियुक्तीचा समारंभ पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी मा. निसार शेख यांनी अब्दुल सुलेमान यांच्या कार्यक्षेत्राची प्रशंसा केली आणि त्यांना तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी आपल्या कार्याचा विस्तार करण्याची शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page