मी युवासेनासाठी प्रामाणिकपणे काम केले, पण दुर्लक्ष झाल्याने पक्षबदलाचा निर्णय घेतला…

रियाज खान:“मी युवासेनेत अधिकृत पदावर होतो किंवा नाही, हा मुद्दा गौण आहे..

⚡बांदा ता.२८-: “मी आजवर युवासेनेत मनापासून आणि निष्ठेने काम केले. मात्र, माझ्या कार्याकडे कायम दुर्लक्ष झाले, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेत मी शिवसेनेत प्रवेश केला आहे,” अशी प्रतिक्रिया रियाज खान यांनी दिली आहे.

अलीकडेच झालेल्या त्यांच्या पक्षबदलावर युवासेनेचे बांदा उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना खान म्हणाले, “मी युवासेनेत अधिकृत पदावर होतो किंवा नाही, हा मुद्दा गौण आहे. मला पक्षानेच अधिकृत पद दिले होते. पण स्थानिक पातळीवर युवकांना संघटित करण्याचे, विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले आहे. त्याची दखल घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.”
ते पुढे म्हणाले, “ओंकार नाडकर्णी यांनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. मला कोणाविरुद्ध काही बोलायचे नाही. मात्र, युवासेनेत कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात नाही, हे वास्तव आहे. कार्यकर्त्यांना फक्त वापरून घेतले जाते आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.” खान यांनी स्पष्ट केले की, “मी आता शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आमचा उद्देश पक्ष संघटन मजबूत करणे, स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आणि बांद्यातील तरुणांना दिशा देणे हा आहे.”
“मी कोणाच्याही विरोधात नाही, पण जिथे आपले विचार, प्रयत्न आणि कार्य यांना आदर मिळतो, तिथे राहणेच योग्य. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. यापुढेही लोकांसाठी काम करत राहीन.”
फोटो:-
रियाज खान

You cannot copy content of this page