परशुराम चलवाडी व नीलिमा चलवाडी यांचा शिंदे शिवसेनेशी कोणताही संबंध नाही…

भारती मोरे: चलवाडी दांपत्यांची अडीच वर्षांपूर्वी हकालपट्टी केली..

⚡सावंतवाडी, ता.२५-:
परशुराम चलवाडी आणि नीलिमा चलवाडी यांचा शिंदे शिवसेनेशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती शिंदे शिवसेना महिला शहरप्रमुख भारती मोरे यांनी दिली.

भारती मोरे म्हणाल्या की, “चलवाडी दाम्पत्याची अडीच वर्षांपूर्वीच शिंदे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे सध्या त्यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यांच्या नावाने शिंदे शिवसेनेचा उल्लेख करणे चुकीचे असून पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे,” असे त्या म्हणाल्या.

You cannot copy content of this page