सावंतवाडीत विशाल परबांचा शिंदे शिवसेनेला मोठा धक्का…

⚡सावंतवाडी, ता.२५-:
सावंतवाडीतील शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी परशुराम चलवाडी व नीलिमा चलवाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सावंतवाडी भाजप शहर कार्यालयात युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी परशुराम चलवाडी व नीलिमा चालवाडी यांनी भाजपच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनीही भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांनी दिलेला हा राजकीय झटका चर्चेचा विषय ठरत आहे.

या कार्यक्रमाला भाजपचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page