कणकवलीत दिवसाढवळ्या दुचाकी चोरी…

आचरा रोडवरील मारुती मंदिराजवळील घटना..

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कर्मचारी विद्याधर पवार यांची होंडा शाईन मोटरसायकल (MH-07 AK-9820) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता घडली.

ही मोटरसायकल कणकवली-आचरा रोडवरील मारुती मंदिराजवळ, डॉ. अरुणा बिले यांच्या दवाखान्यासमोर उभी करण्यात आली होती. पवार हे थोडा वेळ खरेदीसाठी समोरील दुकानात गेले असता, परत येताना मोटरसायकल ठिकाणावरून गायब झाली. आजूबाजूला शोध घेऊनही मोटरसायकल न सापडल्याने त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात फिर्याद दाखल केली.

सदर काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटरसायकलच्या हेडलाईटवरील भागावर पांढऱ्या व नारंगी रेडियमने “श्री स्वामी समर्थ” असे लिहिलेले आहे. चोरीचा अधिक तपास हवालदार गुणिजन करत आहेत.

सदर मोटरसायकल आढळल्यास नागरिकांनी कृपया कणकवली पोलीस ठाणे (दूरध्वनी क्र. 02367-232033) अथवा श्री. विद्याधर पवार (मो. 9422159443) यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page