बांदा नट वाचनालयात दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ…

बांदा/प्रतिनिधी
बांदा नट वाचनालयात मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी १०० रुपये वर्गणी भरून विविध दर्जेदार साहित्यानी नटलेले दिवाळी अंक वाचकांना वर्षभर वाचावायास मिळणार आहेत.
उद्योजक भाऊ वळंजू व शशिकांत पित्रे हे वाचनालयासाठी दरवर्षी दिवाळी अंक उपलब्ध करून देतात. आज श्री पित्रे व श्री वळंजू यांच्या हस्ते दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, कॅप्टन शंकर भाईप, अनंत भाटे, घारपी प्रशाळेचे मुख्याध्यापक जे डी पाटील, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page