बांदा/प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नट वाचनालय, बांदा यांच्या वतीने विष्णू नारायण गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी गावकर व सुपुत्र कै. बिपीन गावकर यांच्या स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालय, बांदा येथे होणार आहे. स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असून ती दोन गटांत घेतली जाणार आहे.
इयत्ता तिसरी ते चौथी गटासाठी ‘माझा आवडता छंद’ (वेळ ४ मिनिटे) हा विषय ठेवण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी ‘माझा आवडता संत’ (वेळ ५ मिनिटे) हा विषय ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक शाळेतून फक्त दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांची नावे संबंधित शाळांनी दिनांक १२ नोव्हेंबर पर्यंत नट वाचनालयात द्यावीत. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी या ९४०५५७०३४९ नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांदा मध्ये बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन…
