बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील ईशान कुबडेने भेदक गोलंदाजी करत २० धावा देत ५ फलंदाज बाद केल्याने पुणे येथे झालेल्या खुल्या क्रिकेट सामन्यात थर्ड आय स्पोर्ट्स फाउंडेशन ‘बी’ संघाने वीर क्रिकेट अकॅडमी संघाचा ८४ धावांनी पराभव केला.
या स्पर्धेचे आयोजन थर्ड आय स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. पहिल्या फलंदाजी करताना थर्ड आय स्पोर्ट्स ‘बी’ संघाने ईशान कुबडे (५–२०), आदित्य पवार (१९), सुषम सूर्यवंशी (१४) यांच्या साथीने २१४ धावांचा टप्पा गाठला. उत्तरादाखल वीर क्रिकेट अकॅडमीचा डाव १३१ धावांत आटोपला. ईशान कुबडेच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी फलंदाज असहाय झाले. हार्दिक कामटेने २८ धावा, तर यश कारिंदेने १० धावा केल्या. थर्ड आय स्पोर्ट्स फाउंडेशन ‘बी’ संघाचा हा विजय उत्साहवर्धक ठरला. विजयानंतर संघाने सामन्यातील उत्कृष्ट खेळासाठी ईशान कुबडे याचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
फोटो:-
ईशान कुबडे.
ईशान कुबडेची भेदक गोलंदाजी; थर्ड आय स्पोर्ट्स ‘बी’चा विजयी जल्लोष…
