मुली व स्त्रियांनी सिक्स्थ सेन्सचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास जीवन सुखकर होईल…

सौ. मेघना जोशी:वराडकर हायस्कुल, कट्टा येथे ‘डिजिटल युग व भावनिक गुंता’ या विषयावर व्याख्यान संपन्न..

⚡मालवण ता.०६-:
प्रत्येक मुलींला म्हणा अथवा स्त्रीला म्हणा परमेश्वराने सिक्स्थ सेन्स असणारी एक दैवी शक्ती प्राप्त करून दिलेली असते. स्त्रीच्या मनातील भावनिक गुंता सोडविण्यासाठी या सिक्स्थ सेन्स चा वापर होत असतो. जेव्हा मुली किंवा स्त्रिया एखाद्या समस्येत अडकत असतात तेव्हा त्यांच्यातील सिक्स्थ सेन्स हे त्यांना जाणीव करून देतात की हे करून नको किंवा हे कर. परंतु त्या सिक्स्थ सेन्सचा वापर सुयोग्य पद्धतीने झाला पाहिजे, जर तो योग्य रीतीने झाला तर आपण आयुष्याच्या पथावरून चालताना आपल जीवन सुखकर झाल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका सौ. मेघना जोशी यांनी कट्टा येथे बोलताना केले.

कट्टा येथील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींसाठी शालेय सखी सावित्री समितीच्या वतीने ‘डिजिटल युग आणि भावनिक गुंता’ या विषयावर लेखिका मेघना जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सौ. जोशी या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समितीचे अध्यक्ष तथा सखी सावित्री समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, समुपदेशक सौ. श्रद्धा नाईक, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, सौ. वीणा शिरोडकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. गावडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना सौ. मेघना जोशी म्हणाल्या, समाजात वाटचाल करीत असताना प्रत्येकाने सकारात्मकता पाळली पाहिजे, आपल्यामध्ये सकारात्मकता बाळगली पाहिजे, परंतु कधी कधी नकारात्मकताही जीवनात चांगले घडवते, म्हणून जीवनात नकारात्मकतेचा विचार आणताना एखाद्या गोष्टीच्या दुष्परिणामांचा विचारही केला गेला पाहिजे. जेव्हा समस्या निर्माण होतात, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला अदृश्य जगात काहीतरी निर्णय घेण्याची वेळ येते, ती वेळच महत्वाची असते, आज डिजिटल युगात मुलींमधील असलेला भावनिक गुंता सोडवायचा असेल तर भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी जीवनाची जी पाच सूत्रे सांगितली आहेत त्या सूत्रांचा म्हणजेच मी हे करू शकतो, मी सर्वोत्तम आहे, मी विजेता होणार, आजचा दिवस माझा आहे, आणि परमेश्वर सतत माझ्या बरोबर आहे या पाच सूत्रांचा वापर केल्यास जीवन समृद्ध आणि सुखकारक बनेल असेही सौ. जोशी म्हणाल्या. शेवटी सौ. वीणा शिरोडकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page