कोटकामते लिंगडाळवाडी येथे होणाऱ्या शासकीय आरोग्य उपकेंद्राचे थाटात भूमिपूजन…!

⚡मालवण ता.२९-:
देवगड तालुक्यातील कोटकामते लिंगडाळवाडी येथे होणाऱ्या शासकीय आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन माजी आमदार अजित गोगटे व माजी जि प अध्यक्ष सदा ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या आरोग्य उपकेंद्रासाठी कोटकामते सरपंच ऋतुजा खाजनवाडकर यांनी आपली पाच गुंठे जागा मोफत दिली आहे. बऱ्याच दिवसापासून मागणी असलेल्या या केंद्रासाठी सदा ओगले यांनी सतत पाठपुरावा करून हे उपकेंद्र मंजूर करून घेतले. या केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच ऋतुजा खाजनवाडकर व इतर बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page