कणकवली : सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या मार्फत कणकवली कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात साई रूप हॉस्पिटल, कुडाळ येथील सायकोलॉजिस्ट श्रीमती रूफा नाईक यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवन कांबळे यांनी अंमली पदार्थाचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्यातील विनया सावंत, पोलीस अमलदार सचिन माने, कणकवली कॉलेजचे प्राध्यापक व जिल्हा समन्वयक विजय सावंत, प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक श्री. माने, कार्यक्रम अधिकारी श्री. कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मीना महाडेश्वर, श्वेता कांबळे, कसालकर मॅडम, मीनाक्षी सावंत व दवणे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनचळवळ निर्माण करून समाजातून हा धोका दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
