⚡वैभववाडी ता.२९-: धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणजेच धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शासन आदेश काढावा जालना येथे उपोषण करते दीपक बोराडे आमरण उपोषणास बसले आहेत सदर उपोषणास आमचा पाठिंबा आहे असे निवेदन धनगर समाज सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
यावेळी सुरेश झोरे बापू खरात संतोष साळसकर विजय खरात कानू शेळके संतोष बोडके प्रभाकर बुटे आनंद झोरे सौ दीपा ताटे अमोल जंगले अंकुश जंगले परशुराम लांबर राजू जानकर राजा बुटे मंदार वरक विलास जंगले आदि धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
