कट्टा येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.२९-: कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला या स्पर्धेत इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी मधील विद्यार्थी सहभागी झाले.

   या स्पर्धे अंतर्गत विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन, सिंदुर, पर्यावरण, इत्यादी विषयांवर चित्रे रेखाटली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गट-5 वी
1) सोहम संदिप मुसुरकर (इ. 5वी) – प्रथम
2) काव्या वैभव गिरकर (इ. 5वी) – द्वितीय
3) रुद्र महेश भाट (इ. 5वी) तृतीय

गट – 6 वी ते 8वी –
1) श्लोक समीर चांदरकर – (इ. 6वी) प्रथम
2) गार्गी सुरेश कांबळी – (इ. 7वी) द्वितीय
3)हेमंत शशिकांत तिळवे – (इ. 8वी)तृतीय

गट – 9 वी ते 12वी

1) ममता महेश आंगचकर – (इ. 12वी) प्रथम
2) रुद्राक्ष दिलीप मेस्त्री (इ. 10 वी) द्वितीय
3)सिल्की विजय मेस्त्री (इ. 9वी)तृतीय.

या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाचालक तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे , पर्यवेक्षक महेश भाट तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page