डॉ. अंशू वर्मा:पर्यटन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय परिसंवाद : कोकणाच्या पर्यटनाला नवी दिशा..
⚡मालवण ता.२८-:
कोकणातील पर्यटन समृद्ध आणि निसर्गसंपन्न आहे. येथे जे आहे, तेच देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खूपच सुंदर आहे. यामुळे येथे काँक्रिटचे जंगल उभे राहू नये, अशी अपेक्षा सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित पर्यटन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्द्घाटनप्रसंगी राजस्थान विद्यापीठातील प्राध्यापिका आणि प्रसिद्ध गायिका डॉ. अंशू वर्मा यांनी व्यक्त केली.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, युवा टुरिझम क्लव आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर रोजी टुरिझम : वारसा, संस्कृती, तंत्रज्ञान आणि शाश्वततेचा जागतिक प्रभावासाठी संगम या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. अंतू वर्मा यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संस्था ज्येष्ठ सदस्य डॉ. शशिकांत झाटये, सचिव चंद्रशेखर कुशे, प्राचार्य डॉ शिवराम ठाकुर, गुजरात महाविद्यालयाचे प्रा. धवल पांडया, कोकण जिओग्राफर्स असोसिएशनचे सचिव डॉ. राजाराम पाटील, पर्यटन सप्ताह समन्वयक डॉ. सुमेधा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक केले
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी चर्चात्तत्रातून कोकणच्या पर्यटनाला नवीन दिशा आणि उर्जा मिळेल, अशी अपेक्षा आहे सिंधुदुर्ग महाविद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करते. पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या उपक्रमांचा विद्यार्थी, पर्यटन व्यावसायिक, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले तर कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी पर्यटनाच्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुरक्षितता महत्वाची आहे. स्वच्छता, सेवा याकडे गांभियनि पाहिले गेल्यास संस्कृती, परंपरा यांची ओळख करून दिली पाहिजे. आपली संस्कृती, आपली मातीची घरे, त्यातील घरपण हेच महत्वाचे आहे. आपला शेतकरी आनदी जीवन जगत कसा आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न झाला, तरी आपणही एक नंबरचे पर्यटन उभे करू शकतो. आपला निसर्गच आपत्त्यासाठी सर्वकाही आहे. हेच लक्षात घेतल्यास आपल्याला दुसऱ्यांच्या पर्यटनाकडे पाहण्याचीच आवश्यकता नाही, असे सांगितले .
चर्चासत्रात सादर करण्यात आलेल्या ११० प्राध्यापकांचे पेपरांचे प्रकाशन-मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच मराठी विभागप्रमुख प्रा. के के राबते यांच्या ‘झोंबड एक दृष्टिक्षेप या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी झाले.
यावेळी डॉ शशिकांत झाटये, अॅड. समीर गवाणकर, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, शालेय समिती अध्यक्ष विजय केनवडेकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. हंबीरराव चौगुले, डॉ. प्रमोद खराते यांनी केले.
