पीएम स्वनिधी योजनेचा पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा…

कुडाळ नगर पंचायत प्रशासनाचे आवाहन..

⚡कुडाळ ता.२७-: केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची मुदत आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजी फळ विक्रेते आणि हातगाडी चालकांनी घ्यावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे. ​आ
या योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असुन, आता प्रथम १०,०००/- रुपयांऐवजी १५,०००/- रुपये आणि दुसऱ्यावेळी २०,०००/- रुपयांऐवजी २५,०००/- रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी ५०,०००/- रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी डिजिटल व्यवहार केल्यास त्यांना कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत लोक कल्याण मेळावा विशेष मोहीम राबवली जात आहे. या मेळाव्यात नवीन अर्ज स्वीकारणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे, लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारांसाठी मार्गदर्शन करणे, अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन, लाभार्थ्यांचे प्रोफायलिंग करून शासनाच्या इतर योजनांचाही लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आधारकार्ड, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, पासपोर्ट फोटो-1, पथविक्रेता प्रमाणपत्र,लाभार्थी आणि कुटुंबातील पात्र व्यक्तींचे पंधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व पंधानमंत्री सुरक्षा विमा योजना पॉलिसी प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

You cannot copy content of this page