बास्केटबॉल मिनीगट राज्य स्पर्धेसाठी २३ रोजी जिल्हा निवड चाचणी…

⚡मालवण ता.१९-:
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात सोलापुर शहर येथे दि. १० ते १४ सप्टेंबर या कालावधीत मिनी गट मुले व मुली बास्केटबॉल राज्य स्पर्धा होणार आहेत. या राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनने टोपीवाला हायस्कूल मालवणच्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा निवड चाचणीचे आयोजन केले आहे.

ज्या खेळाडूंची जन्म तारीख ०१/०१/२०१२ नंतरची असेल अशा खेळाडूंना या निवड चाचणीमध्ये सहभागी होता येईल. निवडचाचणी साठी येताना खेळाडूंनी सोबत आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र (ओरीजिनल) एक पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यावे. प्रफुल्ल सामंत, निशिकांत पराडकर, प्रसाद चव्हाण यांची निवड समिती मुला, मुलींचे संघ निवडणार आहेत. अधिक माहितीसाठी सचिव अजय शिंदे (९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा. निवड चाचणीमध्ये जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंनी पालक अथवा प्रशिक्षकांसोबत उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ व कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page