कळसुली ग्रामस्थांनी मानले आभार..
कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या निधीतून कळसुली गावातील तीन शाळांना दुरुस्तीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कळसुली ग्रामपंचायत सरपंच सचिन पारधिये, यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे शाळा दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार कळसुली जि.प.शाळा गवसेवाडी शाळा दुरुस्तीकरीता रु. ५ लाख, जि.प.शाळा भोगनाथवाडी शाळा दुरुस्तीकरीता रु.५ लाख, जि.प.शाळा हुंबरणे शाळा दुरुस्तीकरीता रु.५ लाख, असा निधी उपलब्ध करुन दिला असल्याने गावातील सर्व शाळा सुस्थितीत होणार आहेत. यासाठी कळसुली गावातील ग्रामस्थांकडून पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.
यावेळी सरपंच सचिन पारधीये, उपसरपंच दत्ताराम परब, ग्रा.पं. सदस्या शुभदा देसाई, माजी उपसरपंच गणेश मठकर, बुथ अध्यक्ष आत्माराम नार्वेकर, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिलिप सावंत, दिपक मेस्त्री, शशिकांत पारधिये, गणपत सावंत, लिंगेश्वर पोलिस पाटील महेश केसरकर, नामदेव सावंत, श्रृती नार्वेकर, अपर्णा देसाई, विशाखा देसाई, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
