वैभववाडी तालुक्यातील सहयाद्री पट्ट्यात मेघ गर्जनेसह जोरदार…

*💫वैभववाडी दि.०४-:* वैभववाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला.अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील गावातील आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.सध्या आंबा हंगाम सुरू आहे. आंब्याच्या फळांवर पाऊस पडल्यामुळे आंब्यांवर काळे डाग पडून आंबा कुजण्याची शक्यता आहे.तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत.शेतकऱ्यांनी शेतीत मशागत केली होती,मात्र दुपारी पावसाने हजेरी लावली .वैभववाडी तालुका हा संपुर्ण डोंगराळ आहे.या तालुक्यात शेतकऱ्यांनी आंबा लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. सध्या वैभववाडी तालुक्यामध्ये आंबा-काजू लागवड केलेले हजारो शेतकरी आहेत.काजू हंगाम संपला आहे.बहुतांश शेतकरी बागायतीमधून जास्तीतजास्त उत्पन्न घेत आहेत.सध्या अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा उत्पादनात मोठी घट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे लोकांना काहीसा गारवा मिळाला.मात्र शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. फोटो:कुर्ली येथे मंगळवारी अवकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला.

You cannot copy content of this page