जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत सृष्टी दिघे प्रथम…

⚡मालवण ता.१८-:
सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी सृष्टी पंकज दिघे हिने प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे सृष्टी हिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सृष्टी दिघे हीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत तसेच इतर पदाधिकारी, प्राचार्य हणमंत तिवले, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page