बांदा निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळानी गोकुळाष्टमी केली साजरी…!

⚡बांदा ता.१६-: बांदा निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळानी गोकुळाष्टमी साजरी केली. यावेळी मुलांनी थर रचत दहीहंडी फोडण्याचा देखील आनंद घेतला.
यावेळी सर्व मुलांनी श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती. पारंपारिक वेशभूषेत उत्सव साजरा केला. यावेळी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे यांच्यासह पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page