डेगवे येथील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…!

⚡बांदा ता.१६-: डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत डेगवे, विविध कार्यकारी सोसायटी डेगवे, स्थापेश्वर विद्याविकास मंच, सरस्वती चुडे प्रतिष्ठान यांच्या मार्फत दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना श्री देव  स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या स्थापेश्वर विद्या विकास मंच यांच्या सौजन्याने गणवेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी सभापती भगवान देसाई, सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, शालेय समिती सदस्य प्रवीण देसाई, भरत देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आबा देसाई, विश्वनाथ देसाई, मधुकर देसाई, उत्तम देसाई, श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंचचे संस्थापक पी. एन. तेली, माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित विनोद देसाई, सुशील देसाई, भीमसेन देसाई  पालक-शिक्षक संघाचे कार्यकारणी सदस्य सुदन मेस्त्री, सौ. श्रेया देसाई, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रगती देसाई,  पोलीस पाटील गजानन देसाई, सौ. वैष्णवी केसरकर, पडवे माजगावचे माजी सरपंच लक्ष्मण गवस तसेच डेगवे, पडवे माजगाव, मोरगाव, आडाळी, डिंगणे धनगरवाडी, कळणे या गावातील पालक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक एस. के. सावंत यांनी केले. सूत्रसंचालन ए. एच. मगदूम यांनी केले. आभार सौ. यशदा देसाई यांनी मानले.

फोटो:-
डेगवे येथे गुणवंत विद्यार्थ्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page