⚡बांदा ता.१६-:
ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कराटे प्रशिक्षक किरण देसाई यांच्या बांदा, सावंतवाडी, मळगाव, शिरोडा या प्रशिक्षण केंद्रातील मुलांनी पदकांची लयलूट केली. तब्बल ८ सुवर्ण , ४ रौप्य व ११ कांस्य पदके घेऊन घवघवीत यश संपादित केले.
सर्व मुलांना किरण देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच ओरोस येथेच जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत देखील बांदा, सावंतवाडी, मळगाव, शिरोडा येथील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये ७ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कांस्य पदके मिळवून घेऊन यश संपादित केले. या विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षक किरण देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याकडून किरण देसाई यांच कौतुक होत आहे.
फोटो:-
ओरोस येथे संपन्न झालेल्या कराटे व बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्यांसोबत प्राशिक्षक किरण देसाई.
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेतबांदा, सावंतवाडी, मळगाव, शिरोडा या प्रशिक्षण केंद्रातील मुलांच घवघवीत यश…!
