फौजदारवाडी-आंबोली रस्त्याचे काम निकृष्ट…

ठेकेदार बदला अथवा पुन्हा नव्याने काम करा;नागरिकांची बांधकाम अधिकाऱ्यांकडे मागणी

*💫आंबोली दि.०४-:* फौजदारवाडी – आंबोली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिकांनी केल्यानंतर आज सबंधित अधिकाऱ्यांकडून त्या रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. यावेळी एकतर ठेकेदार बदला , अन्यथा पुन्हा काम करू घ्या. आणि तोपर्यंत बिले देऊ नका अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच याची योग्य ती चौकशी न झाल्यास बांधकाम विभाग मुख्य, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांच्याकडे कामाच्या चौकशीची मागणी करणार असून, उपोषणाचा इशारा शिवसेना पदाधिकारी अनिल चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी शशिकांत गावडे, दिपक मेस्त्री, सदस्य काशिराम राऊत, काका भिसे, हेमंत नार्वेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page