जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या फणसगाव, फोंडा, खारेपाटण, आडेली, तुळस, बांदा, आंबोली, माणगाव, मोरगाव, मसुरे, चौके, आणि हिवाळे या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर खानिकर्म मधून उपलब्ध निधीतून बारा ॲम्बुलन्स खरेदी करण्याबाबतची तातडीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. अतिशय सुसज्ज पेशंट कंपार्टमेंट, स्ट्रेचर, तीन दरवाजा, अध्यावत पेशंट बेड या प्राथमिक सुविधा ॲम्बुलन्स मध्ये असणार आहेत. ॲम्बुलन्स व त्यासाठी प्रशिक्षित वाहन चालक यांची नियुक्ती देखील तातडीने करण्यात येणार आहे. असे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेच्या नियमित पाठपुरावा यामुळे शासन स्तरावरून आणखी सहा ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानिक गरजेनुसार सदरच्या अंबुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वितरीत करण्यात येणार आहेत, असेही जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे उपस्थित होते. चौकट शववाहिका अभावी मृत व्यक्तीची वाहतुकीबाबत कुटुंबीयांची होणारी गैरसोय लक्षात घेता जिल्हा परिषदेकडील यशवंत पंचायत राज यातील बक्षीस रकमेतून तातडीची बाब म्हणून मुख्यालय ठिकाणी शववाहिनी खरेदी करण्यात येत असल्याचे सांगितले. कोविंड मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही शववाहिका निश्चितच उपयोगी पडणार आहे.
