*💫वेंगुर्ला दि.०३-:* घरातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असताना तसेच स्वतः होम क्वारेंटाईन असताना शिरोडा येथील व्यावसायिक व वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सिध्येश उर्फ भाई परब यांनी घरी न थांबता आपला बाजारपेठेतील गिरण व्यवसाय चालू ठेवला व स्वतः तेथे फिरतात. यातून त्यांनी शासनाने पारीत केलेल्या आदेशाचे व नियमांचे उल्लंघन करून कोरोना रोगाचा (कोविड 19 ) या आजाराचा प्रादुर्भाव होईल असे बेजबाबदार कृत्य करुन शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाची अवाज्ञा केली म्हणुन गाव कृती समितीच्या वतीने अध्यक्ष तथा सरपंच मनोज उगवेकर यांनी त्यांच्या विरोधात शिरोडा पोलीस दूरक्षेत्रात कायदेशीर फिर्याद दिल्याने पोलिसांनी श्री. परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सरपंच मनोज उगवेकर यांनी शिरोडा पोलीसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांनी विषाणु (कोवीड19) साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारीत केलेले आहेत. त्याचप्रमाणे शासनाकडिल आदेशान्वये कोवीड 19 या रोगाला प्रतिबंध करण्याकरीता गाव पातळीवर कृती समिती गठीत केलेली आहे सदर शिरोडा गाव कृती समितीकडे शिरोडा येथील ग्रामस्थाकडून तकारी प्राप्त झाल्या की शिरोडा येथील सिद्धेश परब यांच्या घरात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळाली असून कुटुंबातील व्यक्तीचा कोरोना टेस्ट करीता स्वैब घेण्यात आलेला आहे. सिद्धेश परब यांचा देखील कोरोना टेस्ट करीता स्वब घेण्यात आलेला असताना व ते लोकप्रतिनीधी असून सुद्धा कोणतीही काळजी न घेता तसेच नियमांचे उघन करुन शिरोडा बाजारपेठेतील आपल्या मालकीच्या गिरणीवर फिरताना दिसत आहेत. सदर गोष्टीची खात्री करण्यासाठी आपण उपसरपंच रवी पेडणेकर तसेच ग्रामपंचायत व कृती समिती सदस्य राहुल गावडे व कौशिक परब, आरोग्य सेवक सत्यवान वामन मठकर असे आम्ही रविवार दिनांक 2 मे रोजी सध्याकाळी 07.30 च्या मानाने परब यांचे शिरोडा बाजारपेठ येथील गिरणीवर जावुन खात्री केली. तेव्हा सिद्धेश परब हे आम्हाला शिरोडा बाजार पेठेतील त्यांचे मालकीच्या पुरमार गिरण येथे समक्ष हजर असलेले मिळुन आले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी काही न बोलता आपल्या गिरणीचे शटर अर्ध खाली ओढले व आतील कामगार शेखर नार्वेकर तसेच त्यां शटर जवळ उभे असलेले अन्य कामगार अजित नातू यांचे बरोबर बोलत थांबलेले होतो. तेव्हा मी तेथे परब यांस तुमचा स्टॅब रिपोर्ट येई पर्यंत तुम्ही फिरायचे नाही असे असताना तुम्ही नियमांचे पालन केले नाही अशी विचारणा केली असता त्यानी मला असे काही नियमात आहे का, असे म्हणुन तेथे न थांबता तेथुन निघुन गेले. त्यानंतर आम्ही त्याबाबत तहसीलदार प्रविण लोकरे वेंगुर्ला, व तलाठी श्री फिरोज खान शिरोडा यांचे बरोबर फोनद्वारे संपर्क करून सदरची हकिगत कळविली. त्यावरुन तहसीलदार श्री लोकरे यांनी आम्हास सिद्धेश परब यांचेवर दंडात्मक कारवाई अथवा कृती समिती मार्फत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा असे सांगितले त्याचे आदेशान्वये मी पोलीस दुरक्षेत्र शिरोडा येथे सिद्धेश परब यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याकरीता कृती समिती सदस्यासह गेलो आणि संध्याकाळी 07.30वा च्या सुमारास सिद्धेश विजय परब यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी परब यांच्या विरोधात भादवी कलम १८८, २६९,२७० तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ व ४ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ (५१) बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा पोलीस हेड कॉन्स्टेबल रंजीता चव्हाण करीत आहेत.
*शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचायत समिती उपसभापती भाई परब यांच्यावर गुन्हा दाखल
