जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष आणि राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
💫 *सावंतवाडी*:- सावंतवाडी शहरात रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता कोव्हीड केअर सेंटर अपुरी पडण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी नगरपरिषदेच्या सहकार्यानं शहरातील शासकीय इमारती ताब्यात घेऊन याठिकाणी कोव्हीड सेंटर, आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात यावेत जेणेकरून रुग्णांची गैरसोय टळेल. शासकीय इमारती सोबतच शाळा, कॉलेज बंद असल्यानं त्या इमारती, मंगल कार्यालय, हॉल आदीही ताब्यात घ्यावे, बेड उपलब्ध होत नासतील तर गाद्या उपलब्ध करून द्याव्या. तसेच लसीकरण केंद्रावर येणारा ताण लक्षात घेता आणखीन एका ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर तातडीनं उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील शासकीय इमारती आपण ताब्यात घेत योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावे अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
