*ऑक्सिजन प्लांट मधील तो आवाज स्फोटांचा नाही…

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील यांचे स्पष्टीकरण*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये 3 मे रोजी मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास अचानक कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लुज असल्याने हा आवाज जोरात आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले.मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास अचानक आवाज झाला. हा प्लांट दिवसातून आठ ते दहा वेळा चेक केला जातो या कॉम्प्रेसर गॅसमुळे नोझल लूज होण्याची शक्यता असते आणि ही नोझल लूज झाली तर त्याचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो या ठिकाणी आगीचा भडका स्पोट असा प्रकार काही घडलेला नाही या आवाजामुळे पोलीस आणि फायर ब्रिगेडलाही आम्ही तात्काळ कळविण्यात आले. मात्र फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी हजर होती अशी माहिती जिल्हा शल्यचिकिसक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

You cannot copy content of this page