कोळंब उपकेंद्र येथे उद्या मोफत एक्स-रे कॅम्प…

⚡मालवण ता.२२-:
आरोग्य विभाग सिंधुदुर्गच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे व आरोग्य उपकेंद्र कोळंब येथे दि. २३ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत एक्स-रे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

एक्स-रे काढण्यासाठीचा रुग्णांचा वेळ, वाहतूक खर्च, एक्स-रे खर्च वाचविणे, आजारासाठी प्रतिबंधक लसीकरण करणे, लवकरात लवकर निदान करून रुग्णांना लवकर उपचार देणे, हवेमार्फत पसरणाऱ्या साथीच्या रोगांचा गावातील प्रसार नियंत्रित करणे, जास्त जोखमीच्या गटांना म्हणजेच दमा, सर्दी, ताप, खोकला, मानेकडील गाठी, छातीत दुखणे, भूक कमी होणे यासारखी लक्षणे असणाऱ्या तसेच डायबेटीस रुग्ण, तंबाखू सेवन करणारे रुग्ण, वयाच्या हिशोबाप्रमाणे प्रमाणापेक्षा कमी वजन असणारे रुग्ण यासारख्या रुग्णांना सुरक्षित करणे, तसेच रक्त चाचणी, थायरॉईड, बीपी, तपासण्यात येणार आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक व मधुमेही रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page