विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज…

अजय शिंदे:वेंगुर्ले तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या विद्यार्थी गुणगौरव व निवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ संपन्न..

⚡मालवण ता.२२-: आताच्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे . विद्यार्थी स्वयंपुर्ण व्हावा यासाठी माध्यमिक अध्यापक संघ प्रत्येक तालुक्यात गुणगौरव समारंभ राबवत आहे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती सराव परिक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावेल व विद्यार्थी स्पर्धा परिक्षांना अधिक सक्षमपणे सामोरे जातील असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्री अजय शिंदे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सलग्न वेंगुर्ले तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या विद्यार्थी गुणगौरव व निवृत्त कर्मचारी सत्कार कार्यक्रम वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले येथे
माजी तालुकाध्यक्ष श्री जयराम वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री अजय शिंदे जिल्हा कार्यवाह श्री विजय मयेकर माजी कार्यवाह श्री उमेश सुकी, श्री लक्ष्मण पावसकर , श्री अमेय देसाई, श्री गजानन नानचे,श्री नाडकर्णी , तालुका अध्यक्ष अर्जुन माळी सचिव राजू चव्हाण, श्री किशोर सोन्सुरकर आदि मान्यवर उपस्थित होते..

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 मधील वेंगुर्ले तालुक्यातून आलेले प्रथम तीन क्रमांक , निबंध स्पर्धेत तीन गटातील 12 विद्यार्थी ,शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील दोन्ही गटातून प्रत्येकी तीन तीन विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते या समारंभात सत्कार करण्यात आला..

याप्रसंगी श्री उमेश सुकी ,श्री लक्ष्मण पावसकर , श्री विजय मयेकर, सौ उज्जयनी मांजरेकर मॅडम यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष श्री अर्जुन माळी यांनी केले, सुत्रसंचलन श्रीम. वालावलकर श्री राठये सर यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार सचिव श्री राजू चव्हाण यांनी मानले..

You cannot copy content of this page