कोकणी लोकांचा स्वभाव व मैत्री ही जिव्हाळ्याची…

डॉ. संतोष टकले:कोकण हे नितांत सुंदर..

⚡बांदा ता.२९-: कोकण हे नितांत सुंदर आहे. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य बरोबरच कोकणी लोकांचा स्वभाव व मैत्री ही जिव्हाळ्याची आहे. त्यामुळेच कोकणात पुन्हा पुन्हा यावेसे वाटते असे गौरव उद्गार भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. संतोष टकले यांनी येथे काढले.

डॉ. टकले हे मुंबई येथून गोवा येथे जात असताना काही काळ बांदा येथे थांबले होते. यावेळी त्यांचे बांद्याचे माजी उपसरपंच तथा बांदेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम, पत्रकार निलेश मोरजकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सौ. वैशाली पाटील देखील उपस्थित होत्या.

डॉ. टकले हे भाभा मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ असून त्यांनी आतापर्यंत संपूर्ण भारतभरात तारांगण, अंतराळ या विषयांवर हजारो अभ्यासिका घेतल्या आहेत. टकले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना घडविले आहे. कोकणात यायला आपल्याला विशेष आवडते असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.

फोटो:-
बांदा येथे डॉ. संतोष टकले व सौ. वैशाली पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना बाळू सावंत, निलेश कदम व नीलेश मोरजकर.

You cannot copy content of this page