झोळंबेत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२९-: सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी व शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळ झोळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एक जून रोजी निशुल्क रोग निदान व चिकित्सा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी आठ ते दुपारी 12:30 पर्यंत झोळंबे येथील व्यायाम शाळेत होणार आहे.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉक्टर शंकर सावंत, फिजिशियन डॉक्टर चेतन परब, डॉक्टर स्वप्नील परब, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर स्वाती पाटील आधी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात ब्लड शुगरची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. हे शिबिर निशुल्क असून सर्व तपासणीसह औषधे देखील मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी दिलीप घोगळे मो. ९४२११९०३२५, मुन्ना गवस ९४२२५८६०४४, राजेश गवस ९४२२४३५८७६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page