आमदार दीपक केसरकर यांच्याकडून संदेश पारकर यांचं सांत्वन…

सावंतवाडी : शिवसेनेचे नेते, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते संदेश पारकर यांची भेट घेतली. संदेश पारकर यांच्या मातोश्रींचे काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे दीपक केसरकर यांनी पारकर यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे उपस्थित होते. यावेळी पारकर यांनी वैद्यकीय सेवा जिल्ह्यामध्ये चांगल्या मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती देखील श्री. केसरकर यांच्याकडे केली .

You cannot copy content of this page