बांदा/प्रतिनिधी
निगुडे पाटीलवाडी येथे आज मुसळधार वादळी पावसात वीज खांब उन्मळून पडल्याने वाडीतील वीज पुरवठा खंडित झाला. मात्र महावितरणचे अधिकारी व स्थानिक वायरमन फोन उचलत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज खांब कोसळला. यामध्ये वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती देण्यासाठी महावितरणचे बांदा शाखेचे कनिष्ठ अभियंता श्री ठाकूर व वायरमन श्री कुडव यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
फोटो:-
निगुडे पाटिलवाडी येथे कोसळलेला वीज खांब.
मुसळधार पावसामुळे निगुडेत विद्युत पोल कोसळला…
