कणकवली : तालुक्यातील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी नागरिकांना चार किलोमीटर चा प्रवास करून कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर वरवडे पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे.
मुसळधार पाऊस सुरू ; कणकवली आचरा मार्ग पुलाचे काम सुरू असल्याने बंद
