कणकवलीत २६ मे रोजी रक्तदान शिबीर…

कणकवली : कणकवलीतील बाळगोपाळ हनुमान मित्र मंडळाच्यावतीने सोमवार २६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बाळगोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शनी जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित केले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी अनिल अणावकर, योगेश जावकर, बाळू वालावलकर यांच्याकडे संपर्क साधावा.

You cannot copy content of this page