कुडाळसाठी नव्याने क्रीडांगण प्लॅन तयार करा…

आम. निलेश राणे:तहसील कार्यालयामध्ये क्रीडा संदर्भात बैठक..

कुडाळ : कुडाळ क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिले आहेत या प्लॅनमध्ये अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा अशाही सूचना दिले आहेत ही क्रीडा संदर्भातील बैठक कुडाळ तहसील कार्यालय येथे झाली.
कुडाळ तालुका क्रीडा विभागाची बैठक तहसीलदार कार्यालय येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी कार्याध्यक्ष तहसीलदार वीरसिंग वसावे, सचिव तथा क्रीडा अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील तसेच जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, काका कुडाळकर, बाबा परब, दादा साईल आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी आढावा घेऊन कुडाळ शहरामध्ये असलेले क्रीडांगण कशा प्रकारे विकसित करता येईल यावर लक्ष वेधला या क्रीडांगणासाठी तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ही मंजूर झालेली निधीचा विनियोग चांगला झाला पाहिजे त्यासाठी नव्याने प्लॅन तयार करा आणि तो मला दाखवा. या प्लॅनमध्ये आधुनिक पद्धतीचे क्रीडांगण व त्यामधील सुविधा असल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा, अशा सूचना क्रीडा अधिकारी शिंदे यांना दिल्या.

You cannot copy content of this page