प्रवासी व पर्यटक यांना दर्जेदार सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आमदार निलेश राणे

मालवण बसस्थानक नूतन इमारतीचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उदघाट्न..

मालवण दि प्रतिनिधी
पर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आले आहे. प्रवासी व पर्यटक यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या दृष्टीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या बरोबरच अधिक सेवा सुविधांच्या दृष्टीने ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यासाठी आपण नेहमी एसटी प्रशासनासोबत आहोत. असे प्रतिपादन मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवण बस स्थानक नूतन इमारत लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील मालवण बस स्थानक पुनःबांधणी कामाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हापरिषद प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, एसटीविभाग मुंबई प्रदेश स्थापत्य कार्यकारी अभियंत्या मीनल सोनवणे, प्रभारी विभाग नियंत्रक सुजित डोंगरे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, उपअभियंता पांडुरंग पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाख, विभागीय स्थापत्या अभियंता अक्षय टेंकरे, विभागीय लेखाधिकारी सुवर्णा दळवी, मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजन वराडकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, माजी जिप सभापती संतोष साटविलकर, दादा नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, निशय पालेकर, भाऊ मोरजे, महिला पदाधिकारी सोनाली पाटकर, अंजना सामंत यासह अन्य महायुतीचे पदाधिकारी, एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी मालवण बस स्थानकाच्या वरच्या मजल्यावर मॉल उभारणी केली जाणार आहे. या माध्यमातूनही प्रवासी व पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे. आमचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

You cannot copy content of this page