पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली आहे . तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे शहराचे मोहन दहीकर यांची नियुक्ती गृह विभागाने केली आहे.
