तात्काळ नगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल: कुठलेही मोठे नुकसान नाही…
⚡सावंतवाडी ता.१६-: येथील विठ्ठल मंदिर परिसरात एका घराला आग लागल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आजूबाजूला असलेल्या लोकांनसह महेंद्र सांगेलकर यांनी तात्काळ नगरपालिकेच्या बंबला पाचारण केले. यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
